By Malvika Kashyap
May 30, 2022
Note Tap the screen for the next slide
डोंगरची काळी मैना म्हणून प्रसिद्ध असलेले करवंद उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. वर्षातून एकदाच मिळणाऱ्या या रानमेव्याची सेवन जरूर करावे.
डोंगरची काळी मैना
करवंदावर कुठल्याही प्रकारची रासायनिक प्रक्रिया केली जात नाही. हे फळ नैसर्गिक रित्या जंगलात वाढते. त्यामुळे याचे सेवन खूप फायदेशीर ठरते.
नैसर्गिक फळ
करवंदात प्रचुर प्रमाणात क जीवनसत्त्व उपलब्ध असते. हे जीवनसत्व त्वचा विकारांमध्ये खूप फायदेशीर ठरते. याच्या सेवनाने दुष्परिणाम होत नाही.
क जीवनसत्व
जर तुम्हाला रक्ताची कमतरता होऊन त्यामुळे अशक्तपणा आला असेल तर दररोज करवंद खाऊ शकता. यामुळे रक्ताची कमतरता दूर होते.
रक्ताची कमी दूर करते
रोज करवंदाचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढते. यामध्ये भरपूर प्रमाणात सायट्रिक ऍसिड असते. यामुळे उष्णतेचे विकार होत नाहीत.
रोगप्रतिकार शक्ती वाढवते
करवंदामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फायबर उपलब्ध असते. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होऊ शकतो. मळमळ-उलटी इत्यादी समस्या सुद्धा कमी होतात.
बद्धकोष्ठता कमी करते
जर तुम्हाला नेहमी आम्लपित्ताचा त्रास होत असेल तर करवंदाचे सरबत घ्यावे. करवंदामध्ये उपलब्ध कॅल्शियममुळे हाडे आणि दात मजबूत होतात.
दात आणि हाडे मजबूत करते
उन्हामुळे होत असलेला त्रास कमी करण्यासाठी करवंद खूपच उपयुक्त ठरते. करवंदाचे सरबत करून पिल्यास शरीराचा दाह कमी होतो.
उन्हाचा त्रास कमी करते
करवंदाचे सांगितलेले फायदे केवळ ज्ञानार्जनासाठी आहेत. जर तुम्हाला याचे सेवन करावयाचे असेल तर प्रथम विशेषज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.
Summary
Next Web Story
To visit next Web Story, Swipe Up the following button or Click on it Thank You!