By Malvika Kashyap
May 30, 2022
Note Tap the screen for the next slide
आपल्या शरीरात असंख्य नवीन पेशी तयार होत असतात. यावेळी जुन्या पेशी खराब होतात आणि त्या नष्ट पावतात. त्यांची जागा नवीन पेशी घेत असतात.
नियमित तयार होणाऱ्या नवीन पेशी
या प्रक्रियेमध्ये काहीवेळा अनियमितता येते. या प्रक्रियेत पेशींची असंतुलित आणि अनियमित वाढ होते. त्यावेळी त्या अवयवाला कॅन्सर होऊ शकतो.
पेशींची अनियमित वाढ
कॅन्सरग्रस्त पेशी रक्तामधून शरीराच्या दुसऱ्या भागात सुद्धा जाऊ शकतात. त्यामुळे शरीराच्या विशिष्ट अवयवांमध्ये गाठ तयार होऊ शकते.
शरीरात गाठ तयार होऊ शकते
जर तुमच्या शरीरावर आलेली एखादी गाठ बरी होत नसेल, शरीरावरील एखादा चट्टा किंवा तोंडामधील जखम बरी होत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
शरीरावरील चट्टा किंवा गाठ
भरपूर जुना खोकला किंवा कफामध्ये रक्त पडणे, अन्न गिळण्यास त्रास होणे, आवाजात बदल होणे, वजनात अचानक घट इ. लक्षणे कॅन्सरची असू शकतात.
कॅन्सर ची लक्षणे
अचानक भूक कमी होणे, स्तनांमध्ये गाठ किंवा व्रण तयार होणे, तसेच उतारवयामध्ये पाळी नंतर अचानक जास्त रक्तस्त्राव झाल्यास सुद्धा डॉक्टरांचा सल्ला घ्या.
महिलांमधील लक्षणे
जेवण केल्यानंतर भरपूर वेळ पोट जड वाटत असेल, करपट ढेकर येत असतील, न पचलेल्या अन्नाची उलटी होत असेल तर कर्करोगाची तपासणी करून घ्यावी.
जठराचा कर्करोग
लघवी किंवा शौचातून अचानक रक्तस्त्राव, बद्धकोष्टतेची खूप तक्रार असल्यास किंवा वा शरीरातून अचानक रक्तस्त्राव होणे ही कर्करोगाची लक्षणे असू शकतात.
रक्तस्राव
जर शरीरावर एखादी गाठ असेल आणि सांगितलेली लक्षणे दिसत असल्यास डॉक्टरांशी वेळीच भेटावे. लक्षणांची माहिती केवळ ज्ञानाकरिता सांगितली आहे.
Summary
Next Web Story
To visit next Web Story, Swipe Up the following button or Click on it Thank You!