Knowledge

maitri kashi asavi

By Malvika Kashyap

June 28, 2022

Worth to Share

Note Tap the screen for the next slide

Phone

खरी मैत्री सुदैवी जीवनात खरी मैत्री असणे हे आपले सुदैव असू शकते. कारण मित्र असा व्यक्ती असतो, जो आपल्याला मनापासून आवडतो आणि ज्याचा नेहमी आदर वाटतो.

निस्वार्थ भावना अंतःकरणापासून जोडणारी निस्वार्थ भावना म्हणजे मैत्री असते. खरा मित्र आपल्या मित्राला नेहमीच चांगला सल्ला देतो. तसेच गरज भासल्यास मदतही करतो.

मैत्री म्हणजे काय एकमेकांच्या समृद्धी आणि प्रगतीसाठी प्रयत्न करणे आणि एकमेकांच्या हिताची इच्छा असणे म्हणजे मैत्री होय. खऱ्या मित्राशी भेटण्याची  मनाला ओढ असते.

सुख-दुःखात सोबती मित्र हे सुख असो किंवा दुःख, दोन्ही वेळी आपल्या सोबत असतात.  मैत्रीबद्दल कुठलेही नियम नसतात. त्यामुळे कोणाचीही कोणाशीही मैत्री असू शकते.

मैत्री टिकवणे महत्त्वाचे चांगले आणि निष्ठावंत मित्र बनवण्यापेक्षा ते मित्र टिकवून ठेवणे खूप महत्त्वाचे आणि कठीण असते. त्यामुळे प्रत्येकाला चांगले मित्र असतीलच असे नाही.

मनातील गुजगोष्टी अनेक वेळा आपण आपल्या मनातील गोष्टी आपल्या नातेवाईकांना सांगू शकत नाहीत.  परंतु त्या सर्व गोष्टी आपण आपल्या मित्रांना नक्कीच सांगू शकतो.

मैत्रीचा अनमोल ठेवा मैत्री ही अनमोल असते. त्यामुळे मित्राशी कधीही वाईट वागू नका. मैत्रीमध्ये कधीही दोष शोधू नये. तसेच मैत्रीचे मूल्यमापनही करू नये.

मैत्रीमध्ये विश्वास असावा खरा मित्र आपल्या मैत्रीबद्दल कधीही देखावा करत नसतो. कारण त्याच्या मैत्रीचा विश्वास हाच पाया असतो. खरा मित्र आपल्याला कधीही धोका देत नाही.

मैत्रीची इतर कुठल्याही नात्याने तुलना करता येत नाही. मैत्रीमध्ये माणूस मुक्त मनाने जगू शकतो. त्यामुळे मैत्रीचे नाते आयुष्यभर टिकवण्याचा नक्कीच प्रयत्न करा.

Summary

Facts of Mullein Benefits

Next Web Story

To visit next Web Story,  Swipe Up the following button  or Click on it Thank You!