Knowledge

Kamva  Ani Shika Yojana

By Santosh Salve

April 5, 2022

Worth to Share

Note अगले स्लाइड पर जाने के लिए,  या विज्ञापन स्किप करने के लिए स्क्रीन टच करें

Phone

कर्मवीर भाऊराव पाटलांनी महाराष्ट्रामध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. यात त्यांनी ग्रामीण, होतकरू आणि गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली.

रयत शिक्षण संस्थेची स्थापना

परंतु यातील बऱ्याच विद्यार्थ्यांची परिस्थिती गरीब असल्यामुळे ते शिक्षण घेऊ शकत नसत. अशा विद्यार्थ्यांसाठी भाऊराव पाटलांनी कमवा आणि शिका योजना सुरू केली.

गरीब विद्यार्थ्यांसाठी सुरू केली योजना

ही संकल्पना त्यावेळेपासूनच खूप लोकप्रिय झाली. कालांतराने ही योजना राज्यातील अनेक विद्यापीठांत सुरू करण्यात आली.  आजही अनेक विद्यार्थी योजनेचा लाभ घेतात.

लोकप्रिय योजना

महाविद्यालयीन किंवा उच्चशिक्षित कुठल्याही विद्यार्थ्यांना अध्यापन किंवा संशोधनापुरतेच मर्यादित न ठेवता त्याची संपूर्ण सांस्कृतिक वाढ हा शिक्षणाचा मूळ दृष्टिकोन असतो.

शैक्षणिक दृष्टिकोन

या योजनेतून विद्यार्थ्यांवर श्रमसंस्कारांचाही वर्षाव व्हावा या विचारानेच कर्मवीरांनी ही योजना सुरू केली. ही योजना महाविद्यालयीन  तसेच पदव्युत्तर पदवीसाठी राबवली जाते.

कुणासाठी आहे योजना?

आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण संपादन करण्यासाठी आर्थिक बळ मिळणे तसेच श्रमाची प्रतिष्ठा जोपासली जावी,  यासाठी ही योजना राबवली जाते.

का राबवली जाते योजना?

विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराच्या दृष्टीने प्रेरणा मिळण्यासाठी तसेच ज्ञान सेवक बनवण्याच्या दृष्टीनेही ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे.

श्रमसंस्कृतीची जाणीव निर्माण होते

यात विविध कामे करून विद्यार्थी अनुभव घेऊ शकतात तसेच यातून आर्थिक पाठबळ मिळवू शकतात. यामुळे त्यांचे मानसिक आरोग्य सुद्धा बळकट होते.

योजनेच्या लाभातून अनुभव

ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयापेक्षा कमी आहे, तसेच ज्यांची निवड सल्लागार समिती द्वारे करण्यात आली, असे होतकरू विद्यार्थी योजनेचा लाभ घेऊ शकतात.

कोण घेऊ शकतो लाभ?

भारत सरकार किंवा अन्य शिष्यवृत्ती मिळणार्यांना यात प्राधान्य दिले जात नाही. तसेच SC/ST किंवा इतर मागास विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून जवळपास 90 ते 100% रक्कम मिळू शकते.

कुणाला रक्कम मिळू शकते?

सदर योजना विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागात राबवण्यासाठीचे अधिकार मा. संचालक, विद्यार्थी विकास हे देऊ शकतात. यासाठी विशिष्ट नमुन्यात कार्यालयात प्रस्ताव सादर करावा लागतो.

योजनेचे अधिकार

योजनेअंतर्गत विद्यार्थ्याला कार्यालयीन तसेच तांत्रिक कामे करावी लागू शकतात. त्याच प्रमाणे फिल्डवर्क जसे की बागकाम, परिसर स्वच्छता, गांडूळ खत प्रकल्प इ. कामे करावी लागतात.

योजनेअंतर्गत कामे

कमवा आणि शिका योजनेअंतर्गत काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना कामाचा मोबदला म्हणून 45 रुपये प्रतितास प्रमाणे मानधन मिळू शकते. 

किती मिळू शकते मानधन?

एकूण महिन्याच्या संपूर्ण तासांची गणना करून मानधनाची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाते. धनादेश मिळाल्यावर विद्यार्थ्याची स्वाक्षरी घेतली जाते.

रक्कम बँक खात्यावर जमा

जर तुम्हीही महाविद्यालय अथवा विद्यापीठात शिक्षण घेत असाल तर या योजनेचा लाभ घेऊ शकता.  अधिक माहिती करता तुम्ही तुमच्या विद्यापीठातील संबंधित कार्यालयात चौकशी करू शकता.

Summary

PM Kusum Yojana

Next Web Story

To visit next Web Story,  Swipe Up the following button  or Click on it 🙏 Thank You!