Knowledge

kalingad khanyache fayde

By Malvika Kashyap

May 17, 2022

Worth to Share

Note Tap the screen for the next slide

Phone

उन्हाळ्यात गर्मीमुळे हैराण झाल्यावर लाल भडक, रसरशीत कलिंगड पाहूनच आपल्या मनाला थंडावा मिळतो आणि आपल्या तोंडाला पाणी सुटते!

उन्हाळ्यात मिळतो थंडावा

कलिंगडामध्ये जवळपास 90% इतक्या प्रमाणात पाणी असल्यामुळे उन्हाळ्यात याच्या सेवनाने आपल्या शरीराची पाण्याची गरज भागू शकते.

भरपूर प्रमाणात पाणी

उन्हाळ्यामध्ये शरीराचे वाढलेले तापमान आणि उष्णता कमी करण्यासाठी कलिंगड खूप फायदेशीर ठरते. यामुळे आपले शरीर आणि  त्वचा हायड्रेटेड राहते.

शरीर राहते हायड्रेटेड

कलिंगडाच्या सेवनामुळे शरीराला भरपूर प्रमाणात एंटीऑक्सीडेंट आणि विटामिन्स मिळतात.  यामुळे कॅन्सर सारख्या भयानक रोगापासूनही आपले संरक्षण होऊ शकते.

कॅन्सरपासून संरक्षण

नियमित कलिंगडाचे सेवन केल्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहू शकते. तसेच यामुळे हृदयविकाराचा धोकासुद्धा कमी होऊ शकतो.

हृदयासाठी उपयुक्त

नियमित कलिंगड खाल्ल्यामुळे उन्हाळ्यात होणारा शरीराचा दाह अत्यंत कमी होतो. तसेच यामुळे उष्णता किंवा जळजळीचा  त्रास सुद्धा कमी होऊ शकतो.

दाह आणि जळजळ कमी करते

नेहमी कलिंगड खाणे आपल्या पचनशक्ती च्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरू शकते.  यात असलेल्या फायबर्स मुळे पचनशक्ती सुधारते.

पचनशक्ती सुधारते

वाढत्या वजनाच्या समस्येसाठी कलिंगड खाण्याची सवय लावा. यातील पोषक घटकांमुळे शरीराचे पोषण योग्य रीतीने होऊन वजन कमी होऊ शकते.

वजन कमी करते

कलिंगडामध्ये असलेल्या विटामिन ए आणि सी मुळे केस आणि त्वचेला खूपच फायदा मिळतो. याच्या सेवनाने केस मजबूत आणि त्वचा मुलायम होऊ शकते.

केस आणि त्वचा

नेहमी कलिंगडाचे सेवन केल्यामुळे मधुमेह सुद्धा नियंत्रित राहू शकतो. यातील अमिनो ऍसिड मधुमेहापासून आपले संरक्षण करू शकतील.

मधुमेहामध्ये उपयुक्त

जर तुम्हाला दात दुखी, दातांचे इन्फेक्शन किंवा तोंडाच्या समस्या असतील तर नियमित कलिंगड खा. यामधील विटामिन सी मुळे दातांच्या समस्या कमी होऊ शकतात.

दातांच्या समस्या

आपल्या शरीरातील किडनी वेगवेगळ्या प्रकारचे विषारी द्रव्य रक्तापासून वेगळे करते. नियमित कलिंगडाच्या सेवनामुळे किडनीचे कार्य सुधारते.

किडनीसाठी उत्तम

उन्हाळ्यामध्ये तुम्ही आपल्या दिवसाची सुरुवात कलिंगड खाऊन करू शकता.  यामध्ये तुम्ही सकाळचा नाश्ता करताना कलिंगड नक्कीच खाऊ शकता.

कलिंगड खाण्याची योग्य वेळ कोणती

कलिंगडामुळे शरीराची पाण्याची पातळी नियंत्रित राहू शकते. त्यामुळे कलिंगड खाणे फायदेशीर ठरू शकते. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार याचे सेवन केलेले अधिक चांगले ठरेल.

Summary

Benefits of  Cloud Computing

Next Web Story

To visit next Web Story,  Swipe Up the following button  or Click on it 🙏 Thank You!