By Malvika Kashyap
April 22, 2022
Note Tap the screen for the next slide (अगले स्लाइड के लिए स्क्रीन टैप करें)
भारतात जवळपास सर्व ठिकाणी हिवाळ्यात डिंकाचे लाडू बनवून खाल्ले जातात. या लाडू मध्ये डिंक, तूप, खारीक, खोबरे, गूळ आणि सुका मेवा घातला जातो.
डिंक शरीराला उष्णता आणि उर्जा देण्याचे काम करते. त्यामुळेच याचे लाडू स्त्रियांना त्यांच्या गरोदरपणात ही कमी प्रमाणात खायला देतात.
डिंकामध्ये भरपूर पौष्टिक तत्व असतात. डिंकाचे लाडू खाल्ल्याने पाठीच्या हाडाला मजबुती येते. तुम्ही लहान मुलांनाही डब्यात किंवा दुधासोबत हे लाडू देऊ शकतात.
डिंकामध्ये असलेल्या फॅट्स आणि कॅलरीज मुळे शरीराला आलेला अशक्तपणा कमी होऊ शकतो. तसेच त्यामुळे बद्धकोष्ठताही दूर होऊ शकते.
कमी प्रमाणात खाल्लेल्या डिंकाच्या लाडूमुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती सुद्धा वाढते. यामुळे तुम्ही सहसा आजारी पडणार नाहीत.
डिंकाचे लाडू बनवून खाल्ल्यामुळे पाचन क्रिया सुरळीत होते. तसेच पोटाच्या इतर विकारांपासून सुद्धा आपली सुटका होऊ शकते.
बदलत्या ऋतू मुळे होणारे कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन टाळण्यासाठी डिंकाचे लाडू अत्यंत उपयुक्त असतात. तसेच डिंकाचे सेवन केल्याने शरीराची झीज भरून येते.
डिंकाचे लाडू बनवून खाल्ल्यामुळे सांध्यातील वेदनेची तक्रार दूर होण्यास मदत होते. तसेच सांध्यातील स्नायू सुद्धा मजबूत होतात.
डिंकाचे लाडू खाल्ल्यामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. त्यामुळे ज्यांच्या शरीरात रक्ताची कमतरता आहे त्यांनी हे लाडू जरूर खावेत.
डिंकाचे सेवन करण्याचे सांगितलेले फायदे हे केवळ माहितीस्तव सांगितले आहेत. डिंक अत्यंत गरम असल्यामुळे याचे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कमी प्रमाणात सेवन करावे.
Next Web Story
To visit next Web Story, Swipe Up the following button or Click on it 🙏 Thank You!