1. शील शील म्हणजे वाईट कृत्य न करण्याची प्रवृत्ती. माणूस किती ही कुशाग्र बुद्धिमत्तेचा असेल पण शीलवान नसेल तर त्याला काहीच अर्थ नाही.

2. दान दान केल्याने माणसाची आसक्ती कमी होते आणि त्याग करण्याची मानसिकता वाढते म्हणून बुद्ध धम्मात दान करण्याला महत्व आहे.

3. उपेक्षा सर्व गोष्टीकडे तठस्थ बघण्याचा दृष्टीकोन म्हणजेच उपेक्षा. कशानेच प्रभावित न होता तठस्थवृत्ती ठेवणे कधी पण चांगले ठरते.

4. नैष्कम्य शरीराच्या विविध गरजा पूर्ण करणाऱ्या वस्तुप्रती अनासक्ती असणे म्हणजे नैष्कम्य. वस्तू मिळाली की आनंद आणि आणि मिळाली नाही की दुःख न होऊ देणे.

5. वीर्य मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक क्षमतेवर अतोनात विश्वास असणे म्हणजे वीर्य पारमिता. सर्व शक्तिनिशी आपले कर्म करत राहणे कधी ही उत्तम.

6. शांती राग न येऊ देणे, शत्रू प्रती क्षमा असणे आणि दयावान राहणे, उदार असणे, म्हणजे शांती पारमिता अंगीकारणे.

7. सत्य नेहमी खरे बोलणे आणि असत्यवादी नसणे म्हणजे सत्य पारमिता चे पालन करणे. सत्य बोलणाऱ्याचे समर्थन करणे ही उत्तम ठरते.

8. अधिष्ठान एखाद्या गोष्टीबद्दल दृढनिश्चय असणे म्हणजे अधिष्ठान पारमिता असणे. आपल्या ध्येया प्रती श्रद्धा बाळगणे आपल्याला प्रगतिशील बनवते.

9. करुणा एखाद्या बद्दल दया भावनेतून प्रेम असणे म्हणजे करुणा पारमिता. करुणा असणे म्हणजे प्राणीमात्रांचे जीवन फुलणे.

10. मैत्री केवळ मनुष्य प्रती नव्हे तर सर्व प्राणिमात्रांच्या प्रती मैत्री भावणा असणे म्हणजे मैत्री पारमिता. मैत्री न बाळगणे म्हणजे मानवता लोप पावणे.